Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांचा ही मनसेला रामराम

maharashatra navnirman sena
, मंगळवार, 5 एप्रिल 2022 (15:26 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात  केलेल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यांबाबत विधान केले. मशिदीवर भोंगे लावल्यास त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल असे म्हणत त्यांनी आदेशच मनसैनिकांना दिले. यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यालयांवर लाऊडस्पीकर लावत मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत लाऊड स्पीकर जप्त केले. राज ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मनसेचे  राज्यभरातील मुस्लीम पदाधिकारी दुखावले गेल्याची चर्चा आहे. पुण्यात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले असून  कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांनी ही मनसेचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडे राजीनामा देण्यात आला आहे.
 
आगामी काळात पुण्यात मनसेला भगदाड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी हालचाली करायला सुरुवात केली आहे. वसंत मोरे यांनी मनसेत कोणताही नाराजी नसल्याचा दावा केला आहे. मात्र, मंगळवारी संध्याकाळी पुणे शहर कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवाण्यात आली आहे. या बैठकीत मनसेतील नाराज मुस्लीम पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल, असे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील मनसेचे काही नगरसेवकही राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा आहे. यापैकी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, इतर नेते व पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी अद्याप संभ्रम आहे. यानंतर कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांनी ही शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडे मनसेचा राजीनामा सोपविला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोकणातील नद्यांचा गाळ सर्वसामान्यांना मिळणार!