Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातात

कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातात
बीड , मंगळवार, 5 एप्रिल 2022 (11:46 IST)
बीडच्या (Beed)अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या घाटनांदूरमध्ये भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जोदरार धडक दिली. या भीषण अपघातात  2 जण जागीच ठार झाले तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री 9:30 च्या दरम्यान  झाला आहे. मिळालेल्या माहितीवरून कारच्या चालकाचे गाडीवरीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक दिली.
 
यावेळी कारने त्या चौघांनाही जवळपास 100 मीटर अंतर फरफटत नेले. यात वैभव सतीश गिरी वय 28 , लहू बबन काटुळे वय 30 हे दोघे जागीच ठार झाले. तर रमेश विठ्ठल फुलारी वय 47, उद्धव निवृत्ती दोडतले वय 50 आणि कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यादरम्यान ग्रामस्थांनी तात्काळ जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले .  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभ्यासक्रमात हुंड्याचे धडे?