Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी वसूल करत त्यांना पावत्या देते, संदीप देशपांडे यांनी सादर केले पुरावे

Webdunia
गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (16:24 IST)
शिवसेनेला विरप्पनची उपमा देणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खंडणीखोर असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे पुरावे देखील संदीप देशपांडे यांनी सादर केले आहेत. फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी वसूल करत त्यांना पावत्या देते, असा आरोप करत संदीप देशपांडे यांनी त्या पावत्या देखील सादर केल्या. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो पावतीवर छापून फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल केली जात आहे, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. दरम्यान, याबाबत मुंबई पोलिसांना भेटून सविस्तर तक्रार देणार असल्याचं देखील देशपांडे यांनी सांगितलं.
 
काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेला विरप्पन गँगची उपमा देत खंडणी वसून करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, आज याबाबतचे पुरावे सादर केले. संदीप देशपांडे यांनी काही पावत्या सादर केल्या.  “आम्हाला पैसे द्या. पालिकेचे कर्मचारी तुमच्या स्टॉलला हात लावणार नाहीत. पोलिसांना आम्ही मॅनेज करु, असं शिवसेना फेरीवाल्यांना सांगतेय,” असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला आहे. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे. या खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. महानगरपालिकेचे कर्मचारी या खंडणी प्रकरणात सामिल आहेत का? याची उच्चपदस्थ चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील संदीप देशपांडे यांनी केली आहे. या खंडणीखोरांच्या हातून मुंबई वाचवणम गरजेचं असून चंबळखोरांचं राज्य मुंबईत आलंय की काय? असा प्रश्न मला कधीकधी पडतो, असं संदीप देशपांडे म्हणाले.

संबंधित माहिती

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

पुढील लेख
Show comments