Publish Date: Fri, 15 Nov 2019 (11:23 IST)
Updated Date: Fri, 15 Nov 2019 (11:24 IST)
शिवसेनेला भविष्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) स्थान मिळण्याची शक्यता मावळल्यात जमा झाल्याचं भाजप नेते राम माधव यांनी मुलाखतीत म्हटलं. राम माधव हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.
संजय राऊत यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आणलं. तोपर्यंत शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्यानं मुख्यमंत्रिपदाबाबत चकार शब्द काढला नव्हता, असं राम माधव म्हणाले.
तसंच, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे जोसेफ गोबेल्स असल्याची खोचक टीकाही भाजप नेते राम माधव यांनी केलीय.