Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्पा तुम्हीच आता महागाई दूर करा - शिवसेना

Webdunia
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (14:52 IST)
भाजपा सोबत सत्तेत असलेली आणि केंद्रात, व राज्यात सत्ता करणारी शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर निशाना साधला आहे. सत्तेत असून सुद्धा नेहमीच भाजपवर जोरदार टीका करत आहे. शिवसेनेच्या मुखपत्र समान मधून पेट्रोल डीझेल दर वाढीवर जोरदार टीका केली आहे. २०१४ काळातील महागाईची डायन अर्थात महगाई गेली तर नाही मात्र अजून उग्र स्वरूपात दिसू लागली आहे.देशात जनतेला इंधनाच्या किंमितीने रोज त्रास देत असून, जे जबाबदार आहेत ते आपली जबाबदारी ढकलत असून, आता गणेश तुम्हीच महागाईचे विघ्न दूर करा असे शिवसेना म्हणत आहेत. वाचा शिवसेना काय म्हणत आहे.
 
‘महंगाई डायन’नष्ट व्हावी म्हणून 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांच्याच काळात ही ‘डायन’पुन्हा जनतेच्या बोकांडी बसली आहे. त्यात रोजच्या इंधन दरवाढीचा मारही सोसावा लागत आहे. पुन्हा ज्यांनी ही दरवाढ नियंत्रणात ठेवायची, तेच तेलाच्या जागतिक बाजारपेठेकडे बोट दाखवीत आपली जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे महागाईचे विघ्न दूर कर आणि आमचे जगणे सुसह्य कर असे साकडे थेट विघ्नहर्त्या गणरायांनाच घालावे लागेल. बुद्धीची देवता असलेले गणपती राज्यकर्त्यांना जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, हिच अपेक्षा आणि प्रार्थना!
 
चैतन्यदायी आणि श्रद्धावान अशा गणेशोत्सवाला आज सर्वत्र नेहमीच्या उत्साहात सुरुवात होईल. राज्यात सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे थाटामाटात आगमन होईल. मराठी जनमानसात रुजलेल्या श्रद्धेचे रूप म्हणजेच गणेशोत्सव. पुढील दहा दिवस महाराष्ट्राच्या घराघरांत, गल्लीगल्लींत, गावागावांत चैतन्य, श्रद्धा आणि राष्ट्रीय व सामाजिक बांधिलकीचे अपार दर्शन होईल. मराठी माणूस आपले सगळेच सण-उत्सव दणक्यात आणि उत्साहात साजरे करीत असतो, पण गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे! मराठी मनाला ‘जिवंतपणा’ची प्रेरणा देणारे जे उत्सव आहेत त्यापैकी एक गणेशोत्सव. कालानुरूप त्यात जरूर बदल झाले आहेत, होत आहेत, पुढेही होतील. शेवटी बदलत्या काळाचे प्रतिबिंब जसे माणसाच्या जीवनात पडते तसे ते सण-उत्सवांमध्येही पडणारच. त्यामुळे गणेशोत्सवातही बदल दिसतातच. अर्थात या बदलांबाबत वैचारिक मतभेदांचे वारे दरवर्षी गणेशोत्सव आला की घोंघावतात. हे बदल नाकारणारे संख्येने खूप कमी आहेत, पण तरीही आपली नकारघंटा जोरजोरात बडविण्याचा हेका ते सोडत नाहीत आणि त्यामुळे निर्बंधांचा वरवंटा दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांवर फिरतोच फिरतो. त्यात हिंदूंचे सण–उत्सव म्हटले की बंधने, हेटाळणी, टीका अशी विघ्ने हमखास येणारच. कधी मंडपांच्या लांबी-रुंदीवर निर्बंध, कधी लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर डेसिबलची मर्यादा कधी दहीहंडीच्या थरथराटावर बंधने, कधी न्यायालयाचा हातोडा, तर कधी प्रशासन व पोलिसांचे दंडुके. अशा अनेक अडथळ्यांची शर्यत हिंदूंच्या सण-उत्सवांना पार करावी लागते. गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. त्यात पर्यावरणवादी नावाचा आणखी एक अडथळा न चुकता दरवर्षी उभा राहत असतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात भाजप अडचणीत, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना प्रतिउत्तर देत म्हणाले- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड न्हवती का?

LIVE: फ्रॉड आहे EVM मशीन म्हणाले संजय राऊत

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments