Marathi Biodata Maker

बाळासाहेबांच्या चरणाशी शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवसेनेची टीका

Webdunia
शनिवार, 7 जुलै 2018 (09:50 IST)
शिवसेनेने रितेश देशमुख यांना बोलण्याआधी स्वत:कडे बघाव, कारण शिवसेना भवनला शिवाजी महाराजांपेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मोठा तर आहेच, त्या बरोबर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. मग आता शिवाजी महाराजांचा अपमान होत नाही का? असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यावरून पुन्हा राजकारण सुरु झाले आहे. रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या राजसदरेत बसून त्यांनी फोटो काढला होता तर तो इंन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यामुळे तो नुसता ट्रोल होतोय असं नाही तर टीकेचा धनीही झाला आहे. मात्र प्रकरण गंभीर होतंय हे पाहत रितेशने माफी मागितली आहे. शिवप्रेमी कमालीचे संतापलेत आहेत. किल्ले रायगडावर राजे शिवाजींच्या राज सदरेतील मेघ डंबरीवर बसून त्यानं फोटो काढले आहेत. सोबत कादंबरीकार विश्वास पाटील आणि दिग्दर्शक रवी जाधवही दिसतायतत हे फोटो त्यानं सोशल वेबसाईटवर टाकले आणि टीकेची झोड उडाली आहे.  यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागतो आहे. असे रितेश ने स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

शिवसेनेचे ‘मिशन 60’ जाहीर, शिवसेनेची पहिली यादी प्रसिद्ध

महायुतीचे ६८ उमेदवार नगरसेवक झाले, पण कसे?

पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कात्रज चेकपॉईंटवर 67 लाखांची रोकड जप्त

मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments