Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NIA चा धक्कादायक खुलासा! सचिन वाझे यांनी विस्फोटक साहित्य खरेदी केले होते.

NIA चा धक्कादायक खुलासा! सचिन वाझे यांनी विस्फोटक साहित्य खरेदी केले होते.
, बुधवार, 31 मार्च 2021 (19:38 IST)
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एनआयए) सूत्रांनी बुधवारी दावा केला आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी अँटिलीयाजवळील वाहनात जिलेटिनच्या कांड्या मुंबई पोलिस निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी खरेदी केल्या आहेत. तथापि, त्याने स्फोटकांच्या स्रोतांबद्दल तपशीलवार माहिती दिलेली नाही.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएला असेही आढळले आहे की वाझे  यांनी आपल्या चालकासह एसयूव्ही अंबानींच्या निवास स्थानाजवळ उभी केली होती. सूत्रांनी सांगितले की एसयूव्हीमध्ये ठेवलेल्या जिलेटिनच्या कांड्या वाजे यांनी खरेदी केल्या.
सूत्रांनी सांगितल्यानुसार एनआयए कडे असे सीसीटीव्ही फुटेज असून घटनास्थळी वाझे यांची उपस्थिती दिसत आहे. ते म्हणाले की, तपासासंदर्भात एनआयची टीम मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. या मुळे वाझेंच्या इतर बाबी कळतील.
सूत्रांनी सांगितले की,पोलिस प्रमुखांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) सह छेडछाड करण्याचे काही प्रयत्न केले गेले आहेत. ते म्हणाले की चौकशी एजन्सी याचा तपास करीत आहे. की आरोपी वाझे यांनी आजूबाजूच्या परिसरातील डीव्हीआर नष्ट केले आहे की नाही. 
सूत्रांनी सांगितले की वाझे यांनी शेजारील ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज व डीव्हीआर नष्ट करण्याचा प्रयत्न केले. त्यावेळी ते तिथेच वास्तव्यास होते. याव्यतिरिक्त, त्यांनी नंबर प्लेट जलाशयात टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले की, एनआयएने रविवारी गोताखोरांच्या मदतीने मिठी नदीतून 1 लॅपटॉप, 1 प्रिंटर, 2 हार्ड डिस्क, 2 वाहन क्रमांक प्लेट्स, 2 डीव्हीआर आणि 2 सीपीयू जप्त केले.वाझे यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. 25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटक सामग्रीसह एसयूव्ही उभारणे आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात एनआयए चौकशी करत आहे.
व्यापारी मनसुख हिरेन यांचे मृतदेह ठाण्याच्या मुंब्रा शहरात एका खाडीत आढळले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना : होम क्वारंटाईन म्हणजे काय? कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?