Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात शूटिंग ला परवानगी देण्यात आली, कोरोना प्रोटोकॉल पाळत चित्रीकरण होणार

राज्यात  शूटिंग ला परवानगी देण्यात आली, कोरोना प्रोटोकॉल पाळत चित्रीकरण होणार
, रविवार, 6 जून 2021 (16:38 IST)
कोरोनामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे,याचा फटका सिने सृष्टीला देखील बसला आहे.कोरोनामुळे चित्रपट,मालिकांचं चित्रीकरण थांबविण्यात आले होते,परंतु राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .
याच अनुषंगाने नियमांना शिथिल करून पुन्हा चित्रिकरण सुरु होण्याचे समजले आहे.

या साठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत महत्वाची बैठक झाल्याचे देखील समजले आहे.राज्यसरकारने शनिवारी केलेल्या घोषणेत जाहीर केले की मुंबई आणि ठाणे मध्ये बायो बबल च्या माध्यमातून शुंटिंग करण्यात येईल.सध्या केवळ 8 तासच शुंटिंग करायला परवानगी दिली आहे.

fwici चे अध्यक्ष बी एन तिवारी म्हणाले की मुंबई आणि ठाण्यात शूटिंग ला परवानगी मिळाली आहे.आम्ही इतरवेळी 12 तास काम करतो सध्या 8 तास काम करण्याची परवानगी विषयी राज्यशासनाशी बोलणार आहो. सध्या काही निर्मिते परगावी शूटिंग करत आहे .लवकरच ते आपली शुटिंगचे काम संपवून राज्यात परततील.

सध्या तौक्ते चक्रीवादळा मुळे आमचे बरेच नुकसान झाले असून आता बायो बबलचं पालन करून शूटिंग करावी लागणार. या पूर्वी आम्ही सेटवरील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे काम पूर्ण करून घेऊ असं ही ते म्हणाले.त्यामुळे मुंबईत पुन्हा लवकरच शूटिंग सुरु होईल असे ही त्यांनी सांगितले.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरोघरी पिझ्झा पोहोचू शकत, तर रेशन का नाही -सीएम केजरीवाल