Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नितेश आणि निलेश राणेंनी खुल्या मैदानात यावं, मी एकटा त्यांना भिडतो; आ. वैभव नाईक यांचे आव्हान

Webdunia
सोमवार, 21 जून 2021 (08:16 IST)
शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील जनता पाहात आहे. नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून या संघर्षाची धार आणखीनच तीव्र झाली. अशातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांनी राणेपुत्रांना खुले आव्हान दिले आहे. या आव्हानाला राणे पुत्रांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
 
आ. वैभव नाईक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांना मैदानात उतरण्याचं आव्हान दिलं. शिवसेना आणि भाजपमध्ये पेट्रोल पंपावर राडा झाल्यानंतर सोशल मीडियावर वाकयुद्ध रंगत आहे. ‘हिंमत असेल तर थेट नितेश राणे आणि निलेश राणे यांनी मैदानात उतरावं,’ असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. वैभव नाईक यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका जाहीर केली आहे.
 
कुडाळच्या रणांगणात कुणी कुणाला प्रसाद दिला, हे नितेश राणेंना मुंबईतल्या ‘अधीश’ बंगल्यात बसून समजणार नाही. त्यासाठी त्यांनी षंढपणा सोडून कुडाळच्या रणांगणात उतरण्याची हिंमत दाखवायला हवी होती. म्हणजे त्यांना सुद्धा शिवप्रसादाची चव चाखायला मिळाली असती. दहा वर्षांपूर्वी वेंगुर्ला शहरात झालेल्या राड्यामध्ये नितेश राणेंनी शिवप्रसादाची चव चाखली होती. त्यावेळी शिवसैनिकांना घाबरून कार्यालयात शटर ओढून लपून बसलेले नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तरण्याबांड मुलाची बाबा मला वाचवा… अशी मदतीची आर्त हाक ऐकून शेवटी म्हाताऱ्या बापाला लाठ्या काठ्या, सोड्याच्या बॉटल, तलवारी घेऊन मैदानात उतरावे लागले होते. एका बापासाठी यापेक्षा वेगळे दुर्दैव ते कोणते? असं म्हणत वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर घणाघाती टीका केली.
 
शिवसैनिकांशी मैदानात सामना होतो तेव्हा वडिलांच्या मागे लपून मदतीची याचना करणाऱ्या नितेश राणेंसारख्या भित्र्या आणि पळपुट्या मुलाने घरात बसून शिवसेनेसमोर फुसक्या वल्गना करू नयेत. ट्विटरवर बसून टिवटिव करण्याव्यतिरिक्त ते कोणत्याही रस्त्यावरच्या लढाईत उतरू शकत नाहीत, हे एव्हाना त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळून चुकले आहे. त्यांच्यासारखीच गत त्यांचे मोठे बंधू असलेल्या निलेश राणेंची आहे. कोणत्याही आंदोलनात किंवा राड्यात नेतृत्व करायची किंवा हाणामारी करायची वेळ आली की निलेश व नितेश हे दोघेही बंधू शेपूट आत घालून पळ काढतात आणि बिळात जाऊन लपतात. नेहमीच कार्यकर्त्यांना मार खाण्यासाठी मैदानात सोडून हे दोघेही भाऊ पळपुटेपणा करतात. इतिहासात दुसऱ्या बाजीरावाची नोंद ‘पळपुटा बाजीराव’ अशी झाली होती. सिंधुदुर्गाचा राजकीय इतिहास लिहिला जाईल तेव्हा राणे बंधुंची नोंद ‘पळपुटे राणे’ अशीच केली जाईल. दोघेही राणे बंधु फक्त ट्विटरवर बसून फुकाच्या वल्गना करू शकतात. प्रत्यक्षात ते इतके भित्रे आहेत की शिवसैनिकांच्या भीतीने काळे कपडे घातलेल्या खासगी सुरक्षारक्षकांच्या दोन ते तीन बोलेरो गाड्या घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरत असतात. शिवसैनिकांचा खुल्या मैदानात सामना करण्याची या दोघाही भावांची कधीच हिंमत होणार नाही, अशा शब्दांत आमदार नाईक यांनी राणे बंधूंचा समाचार घेतला आहे.
 
जेव्हा डंपर आंदोलनावेळी पोलिसांनी चोप देण्यास सुरुवात केली तेव्हा स्टंटबाजी करणारे नितेश राणे कार्यकर्त्यांच्या मागे दडून बसले. त्यांचा त्यावेळचा लपलेला फोटो सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल झाला होता. त्याच डंपर आंदोलनात पोलिसांनी जेव्हा शिवसैनिकांवर लाठीमार केला, तेव्हा मी शिवसैनिकांसोबत पोलिसांचा मार खाल्ला, परंतु कुठेही लपलो नाही किंवा आंदोलन सोडून पळालो नाही. २०१३ साली कणकवली शहरात जेव्हा आमनेसामने राडा झाला तेव्हा शिवसैनिकांसोबत मी स्वतःसुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना जाऊन कशाप्रकारे भिडलो हे टेलिव्हिजनवर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आमचा इतिहास हा प्रत्यक्ष खुल्या मैदानात जाऊन भिडण्याचा आहे तर नितेश राणेंचा राजकीय इतिहास हा पळपुटेपणा करण्याचा आहे. शिवसेनेचा जन्म हाच मुळी आंदोलनातून झालाय. त्यामुळे शिवसैनिकांना मैदानात उतरून संघर्ष करणे शिकवावे लागत नाही. आज सुद्धा मी माझ्या शिवसैनिकांसोबत राणेंच्या पेट्रोल पंपावर स्वतःच घुसलो आणि मग भाजप कार्यकर्त्यांसोबत आमची बाचाबाची झाली. वाघाला शिकार करण्यासाठी शत्रूचाही इलाका चालतो. त्यामुळे मी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही खुले आव्हान देतो की ट्विटरवर टिवटिव करायची सोडून द्या आणि तुम्ही दोघेही भाऊ एकदा काळ्या गणवेशातील अंगरक्षक बाजूला ठेऊन खुल्या मैदानात उतरायची हिंमत दाखवा. तुमचा दोघांचाही सामना करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मी एकटाच येईन. निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या आवडीचे ठिकाण निवडावे आणि शिवसेनेविरोधात एकदा खुल्या मैदानात उतरून दाखवावं, असं म्हणत वैभव नाईक यांनी म्हटल आहे. 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments