Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूरप्रमाणेच नाशिकमध्ये डबलडेकर उड्डाणपूल तयार करणार

Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (21:42 IST)
नाशिकमध्ये  द्वारका सर्कल ते नाशिकरोड या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मार्गावर नागपूरप्रमाणेच डबलडेकर उड्डाणपूल तयार करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाशिकमध्ये केली. खाली चार पदरी हायवे, त्यावर चार पदरी उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रोचा मार्ग असा हा प्रकल्प आहे. त्यासाठी १६०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, महामार्ग प्राधिकरण आणि मेट्रो यांच्या संयुक्त विद्ममाने हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
 
नाशिक शहरासह जिल्ह्यातील १ हजार २६३ कोटींच्या ६ विविध प्रकल्पांचं लोकार्पण केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिकमधील सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. ४१४ कोटी रुपये खर्चाच्या ६ प्रकल्पांच्या कोनशिलेचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र्यांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आपण या प्रकल्पाबाबत चर्चा करत निर्णय घेतला असल्याचं गडकरींनी सांगितलं. नाशिकमध्ये नाशिकरोड ते द्वारका हा एलिव्हेटेड मार्ग असून, त्यावर २१०० कोटी रुपये खर्चाचा मेट्रो प्रकल्प मंजूर झालेला आहे. गंगापूर ते नाशिकरोड आणि गंगापूर ते मुंबई नाका हा मेट्रोचा मार्ग आहे. त्यातील गंगापूर ते नाशिकरोड या मार्गावर डबल डेकर उड्डाणपूलाची गरज व्यक्त केली जात होती. त्यानुसार या प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा गडकरींनी केली. या डबल डेकर उड्डाणपूलाचं डिझाईन तयार करायला सांगितलं आहे. या प्रकल्पामुळे द्वारका सर्कल भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी संपेल. अपघात टळतील. मेट्रोसोबत हा प्रकल्प साकारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. पुढील २ वर्षांत या प्रस्तावित पुलाच्या उद्घाटनासाठी आपण येऊ, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाण्यात रुग्णालयात रुग्णाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्रात दारू विकत घेण्यासाठी वयाची अट किती ? आबकारी नियम माहित काय म्हणतात

3 पुर्‍या एकत्र खाल्ल्याने मृत्यू ! डाक्टर देखील हैराण

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर फेकला मोबाईल, चेहऱ्यावर जखमा

LIVE: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा यावर भाष्य केले

पुढील लेख
Show comments