Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sindhudurg: 'हा' संपूर्ण जिल्हाच CCTVच्या कक्षेत; राज्यात असं प्रथमच घडलं!

Sindhudurg: 'हा' संपूर्ण जिल्हाच CCTVच्या कक्षेत; राज्यात असं प्रथमच घडलं!
, बुधवार, 29 जुलै 2020 (09:33 IST)
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा Sindhudurg distric आता सीसीटीव्हीच्या कक्षेत आला आहे. राज्यातील एखादा जिल्हा पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कक्षेत येण्याची ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्गला हा मान मिळाल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष कौतुक केले. (Sindhudurg District Under CCTV Surveillance )
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरिकांची सुरक्षितता व गुन्हे नियंत्रण करण्यासाठी एकूण ९३ ठिकाणी २८० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी हायटेक प्रकल्पाच्या माध्यमातून पोलीस काम करत असल्याबद्दल देशमुख यांनी स्तुती केली. गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त आहेत, असे नमूद करताना सध्याच्या करोनाच्या काळात जिल्ह्यातील पोलीस दल, महसूल यंत्रणा आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. त्यांच्या कामाचे मला कौतुक असल्याचेही ते म्हणाले.
 
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, 'डीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सदुपयोग जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी चांगल्या प्रकारे केला आहे. ही यंत्रणा जिल्ह्यासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच यामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही सांगितले. आमदार नितेश राणे यांनीही यावेळी पोलीस दलाचे अभिनंदन केले व अशा चांगल्या कामांमध्ये सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील महिला अधिक सुरक्षित होतील. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सर्वांचे स्वागत केले व या हायटेक प्रकल्पाची माहिती दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज दहावीचा एस एस सीचा नक्कल या ठिकणी पहा निकाल ऑनलाईन