Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहिणही शेततळ्यात बुडाली, दोघांचा मृत्यू

भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहिणही शेततळ्यात बुडाली  दोघांचा मृत्यू
Webdunia
मंगळवार, 18 जानेवारी 2022 (16:03 IST)
पाटण तालुक्यातील रोमनवाडी-येराड येथे फार्महाऊसवरील शेततळ्यात बुडून बहिण, भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सौरभ अनिल पवार (16) आणि पायल अनिल पवार (14) असे या मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. मासेमारी करणार्‍यांच्या साह्याने शोध घेऊन रात्री सातच्या सुमारास बहिण-भावाचे मृतदेहबाहेर काढण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे रोमनवाडी -येराड येथे एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस वर सचिन जाधव कामासाठी आहे. सोमवारी सचिन यांच्याकडे त्यांचे नातेवाईक अनिल पवार आपल्या कुटुंबाला घेऊन भेटावयास आले होते. ते कामानिमित्त विजयनगर येथे वास्तव्यास आहे. मुलगा सौरभ हा आयआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर मुलगी पायल ही इयत्ता आठवीत होती. पवार कुटुंब सचिन जाधव यांच्याकडे भेटायला आले होते.
 
सौरभ आणि पायल हे फार्महाउस पाहण्यासाठी गेले असता काळाने त्यांच्या मुलांवर झडप घातली आणि सौरभचा पाय घसरून तो फार्महाउस जवळच्या शेततळ्यात पडला. आणि बुडू लागला . आपल्या मोठ्या भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहीण पायल ही देखील पाण्यात बुडू लागली आणि क्षणातच हे दोघे भाऊ बहीण शेततळ्याच्या पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळतातच सचिन जाधव आणि मुलांचे आईवडील शेततळ्याजवळ पोहोचले तो पर्यंत ते दोघे बुडाले होते. ही दुर्देवी घटना सोमवारी सांयकाळी घडली. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांसह गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह रात्री उशिरा मच्छीमार करणाऱ्या मुलांच्या मदतीने काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आले . मुलांचे मृतदेह पाहता आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

सुरगाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले

उद्धव ठाकरे सरकारमध्ये पुरावे नष्ट, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजप नेते राम कदम यांची नवी मागणी

LIVE: पंतप्रधान मोदी ३० मार्च रोजी नागपूर शहरात पोहोचतील

मुख्यमंत्री योगींनी राहुल गांधींना "नमुना" म्हटले, संतप्त काँग्रेस नेते म्हणाले- यूपीवर लक्ष केंद्रित करा...

हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूर शहरात पोहोचतील

पुढील लेख
Show comments