Publish Date: Thu, 03 Mar 2022 (13:19 IST)
Updated Date: Thu, 03 Mar 2022 (13:20 IST)
औरंगाबाद - मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या 28 वर्षीय तरुणासह आणखी पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवसी वेगवेगळ्या घटनेत सहा आत्महत्या उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार हा आत्महत्येचा वार ठरला असून या दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात सहा जणांनी आत्महत्या केली आहे.
खान शहाजील रजा खान (वय 28 रा. शहा नगर बीड बायपास) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. दुसर्या घटनेत रिक्षाचालक 36 वर्षीय तरुणाने घरातील सीलिंग फॅनला ओढानिच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसर्या घटनेत आचारी काम करणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीने घरातील फॅनला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर चौथ्या घटनेत मजुरी काम करणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गणेश वाल्मीक गोते (वय 22) रा. रोहिणी ता. चाळीसगाव जि. जळगाव ह. मू. सिद्धेश्वर नगर असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सहाव्या घटनेत अविनाश राजू पवार वय 22 रा. जोगेश्वरी ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
सर्व प्रकरणात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.