सोलापुरात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांवर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी भीम आंर्मीचे अजय मेंदर्गीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना काळे झेंडे दाखवत भीम आर्मीच्या वतीने खासगीकरणाच्या विरोधात निर्दशने करण्यात आली. भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मेंदर्गीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
या वेळी चंद्रकांत दादा पाटील मोटारीतून उतरल्यावर त्यांचा अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी अजय मेंदर्गीकर यांना ताब्यात घेतले आहे. या पूर्वी देखील चंद्रकांत दादा पाटीलांवर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.