Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Amravati Crime:पतीने सासरच्यांना जिवंत जाळले

Webdunia
मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (16:21 IST)
Amravati Crime अमरावती जिल्ह्याच्या वरूड तहसील बेनोडा पोलीस ठाणे हद्दीत रात्री 1 वाजताच्या सुमारास एका जावयानेच सासूला आणि भावाला जिंवत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी जावयाने (son in law) स्वत:ला देखील जिवंत जाळून आत्महत्या केलीआहे ही घटना घडली आहे. घरात आग लागल्याचे कळताच ही घटना उघडकीस आली आहे.  त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होतं आगीवर नियंत्रण आणले होते. या दरम्यान घरात तीन जणांचा मृतदेह जळाल्या अवस्थेत सापडला होता.यावेळी पोलिसांनी तत्काळ मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत आरोपी आशिष ठाकरे याचे काहीच महिन्यापूर्वी लता भोंडे यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. या विवाहाच्या दोनच महिन्यानंतर पती-पत्नीमध्ये खटके उडायला सूरूवात झाली होती. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. आशिष ठाकरे यांनी बायकोला माहेरी आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.मात्र जावई आशिष ठाकरे दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असल्याने सासू आणि भावाने याला विरोध केला. आशिष ठाकरे याने दोन ते तीन वेळा सासू आणि भावाला बायकोला माहेरी पाठवण्याची मागणी केली होती, तसेच सासरच्यांना धमकावले देखील होते. मात्र बायकोच्या भावाने या धमकीला न घाबरता त्याला काहीच उत्तर दिले नव्हते.
 
यामुळे रागावलेल्या आरोपी आशिष ठाकरे याने बाईक घेऊन सासर गाठलं आणि सासू आणि भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळलं. यानंतर स्वत:वर देखील पेट्रोल ओतून आत्महत्या केली.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

ऋषिकेश-चंबा महामार्गावर अपघात,ITBP जवानांनी भरलेली बस उलटली

माजी पोलिस आयुक्तांवर दाखल केलेला खटला तक्रारदारची मागे घेण्याची मागणी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments