Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडिलांची आत्मा काढण्यासाठी मुलाने केली आईची हत्या

Webdunia
मुंबईत फॅशन डिझाइनर सुनीता सिंहच्या हत्या प्रकरणी तिच्या मुलाला अटक केली गेली आहे. चौकशीत काही विचित्र गोष्टी उघडकीस आल्या आहेत.
 
मॉडेल मुलाने सांगितले की आईला मारणे त्याच्या हेतू नसून त्याला केवळ आईतून वडिलांची आत्मा काढायची होती. मुंबईच्या लोखंडवाला स्थित फ्लॅटमध्ये 4 ऑक्टोबर रोजी सुनीताची हत्या केली गेली.
 
आरोपी मुलगा लक्ष्य याने पोलिसांना सांगितले की आईत वडिलांची आत्मा येत असताना ती विचित्र वागायची. पेश्यांपासून ते नशा करण्याचा हठ्ठ धरायची. एवढेच नव्हे तर त्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकायची आणि नकार दिल्यावर भांडायची.
 
लक्ष्यने सांगितले की बुधवारी मित्रांसोबत पार्टी करत असताना त्याची आई नशेत तिथे येऊन विचित्र वागू लागली. पोलिस त्याच्या मित्र निखिल आणि महिला मैत्रिणीशी चौकशी करत आहे. पोलिसांप्रमाणे लक्ष्याची महिला मैत्रीणदेखील व्यसन करते. त्या दिवशी तो एका बाबाला देखील भेटला होता आणि पोलिस त्याचाही तपास करत आहे. दरम्यान त्याने आईशी मारहाण करत तिला बाथरूममध्ये कोंडून दिले होते आणि तिथून निघून गेला होता.
 
पोस्टमॉर्टम रिपोर्टप्रमाणे सुनीताच्या चेहर्‍या आणि मानेवर जखम होती ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. लक्ष्यने चौकशीत सांगितले की सायंकाळी 8 वाजता घरी आल्यावर त्याला आई बाथरूममध्ये बेशुद्ध पडलेली दिसली. नंतर त्याने मित्रांना फोन करून या प्रकरणाबद्दल सांगितले आणि आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी एम्बुलन्स मागवली तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.
 
पोलिसांप्रमाणे लक्ष्यला अटक केली गेली तेव्हा तो नशेत होता. त्याला अॅस्ट्रोराइड नामक ड्रग्स घेण्याची सवय आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: शनिवार 30 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

फडणवीस नाही तर हा भाजप नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार का?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

पुढील लेख
Show comments