Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विवाहितेची गळफासाने आत्महत्या; शिक्षक पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 16 मार्च 2020 (12:46 IST)
शिक्षक पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
याप्रकरणी विवाहितेचे वडील विठ्ठल रामराव कासार (व 73, रा. लक्ष्मी कॉलनी, एकता रोड, लातूर) यांच्या फिर्यादीवरून जीवराज अनंतनाथ खोबरे (रा. वर्धमान हाइट्‌स, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. रत्नप्रभा जीवराज खोबरे असे आत्महत्या  केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
 
फिर्यादीची मुलगी रत्नप्रभा हिचा विवाह 1996 मध्ये जीवराज याच्याबरोबर झाला होता. रत्नप्रभा हिचा पती जीवराज तिला सतत मानसिक त्रास देऊन शिवीगाळ, दमदाटी करीत असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करून जाचहाट करीत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून रत्नप्रभा हिने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments