Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटीच्या १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांना वेतन वाढ

Webdunia
शनिवार, 8 एप्रिल 2017 (10:55 IST)

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एसटी महामंडळाच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. तर कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून एक वर्ष करण्यात आला आहे.

विधान परिषदेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. 1 एप्रिल 2017 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे . कनिष्ठ वेतनश्रेणीत सहा महिने पूर्ण झाल्यानंतर वेतनात 500 रुपयांनी वाढ करण्यात येईल. एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल.  कनिष्ठ वेतनश्रेणी 2000 साली लागू करण्यात आली. सेवेत रुजू झाल्यानंतर 5 वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम करण्याची त्यावेळी तरतूद करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ होतो. मात्र 2012 पासून कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षे एवढा करण्यात आला. या वेतनश्रेणीत सध्या एकूण 25 सेवाअंतर्गत 12 हजार 514 कर्मचारी कार्यरत आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments