Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
, सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (17:24 IST)
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. एसटीच्या या प्रस्तावाला सरकारकडून आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. 
 
मंगळवारपासून (26 ऑक्टोबर) राज्यभरात एसटीच्या दरात सतरा टक्क्यांची वाढ होणार आहे. ही दरवाढ दिवाळीच्या तोंडावर होत आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यातील परिवहन बस तोट्यात होती. कर्मचाऱ्यांच्या पगारीही वेळेवर होत नव्हत्या. एसटी प्रशासन तोट्यात असण्याचे एक कारण म्हणजे ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते. यासाठी एसटी प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे मंगळवारपासून राज्यभरात एसटी तिकिटाचे दर सतरा टक्क्यांनी वाढणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले