Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 60 हजार ‘होमगार्ड’वर उपासमार; कोरोना आपत्तीत कामाची संधी द्या!

Webdunia
बुधवार, 5 मे 2021 (07:21 IST)
सामर्थ्य प्रबोधिनीचे सुशांत भिसे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्याकडे मागणी
 
निवडणूका, संप, दंगली, भूकंप, जयंती-उत्सव अशा कठीण प्रसंगी शासनाच्या आणि पोलीस विभागाच्या मदतीसाठी होमगार्ड हे मदतीसाठी सज्ज असतात. परंतू, कोरोना महामारी विषाणूमुळे देशातील सर्व राज्यामध्ये सांसर्गिक विषाणूंची नागरिकांना मोठ्या प्रमाणात बाधित (लागण) होऊन हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. नागरिकांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये युद्धजन्य संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे मानव निर्मित व नैसर्गिक आपत्तीसह कायदा व सुव्यवस्था राखणे याकरिता मानसेवी होमगार्ड संघटनेच्या राज्यातील 60 हजार प्रशिक्षित आजी-माजी होमगार्ड जवानाना कामाची संधी उपलब्ध करावी, अन्यथा त्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी मागणी सामर्थ्य प्रबोधिनीचे सुशांत भिसे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
 
याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणू रूग्ण संख्येत सततची होणारी वाढ आणि त्यावरती अध्यापर्यंत थेट कोणताही संरक्षणानात्मक औषध उपचार उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये युद्धजन्य संकट निर्माण झालेले आहे. देशातील महाराष्ट्रात जागतिक स्तरावरील मानसेवी होमगार्ड संघटना, ही सण 1947 साली मानव निर्मित व नैसर्गिक आपत्तीच्या तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे कामी वाहतूक, दळणवळण, पाणीपुरवठा ,वीजपुरवठा, आरोग्य अश्या अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी शासनाने स्थापन केली. स्वयंसेवी होमगार्ड दलात अग्निशमन, पूरविमोचन ,प्रथमोपचार ,, शस्त्र प्रशिक्षण ,शारीरिक कवायती प्रशिक्षण, निशस्त्र युद्ध ,कायदा व सुव्यवस्था, दळणवळण वाहतूक ,यासारखे विविध विषयाचे प्रशिक्षण हे होमगार्ड जवानांना शासनाने दिलेले आहे. असे जवळपास महाराष्ट्र राज्य मध्ये 60000 प्रशिक्षित आजी माजी होमगार्ड जवान (सदस्य)आहेत.
 
कोरोना महामारी रोगा सारख्या युद्धजन्य परिस्थितीत वैद्यकीय व सुरक्षा सेवेसाठी अत्यंत तळागाळातील हितकारक व गुणकारक सेवा व्हावी अशी गृहरक्षक दल ही स्वयंसेवी संस्था एकमेव हिताची ठरू शकते. कारण होमगार्डमध्ये डॉक्टर्स, नर्सेस ,वकील ,शिक्षक, खेळाडू ,वाहनचालक, शासकीय-निमशासकीय कर्मचारी , बँका, विमा, कंपन्या,खाजगी क्षेत्रातील टर्नर वेल्डर पेंटर फिटर इलेक्ट्रिशियन असे टेक्निकल कामगार स्वयंसेवक दाखल झालेले. सर्वसमावेशक प्रशिक्षित जवान आजपर्यंत कोणत्याही प्रसंगी निवडणूका ,संप ,दंगली, भूकंप, जयंती अशा कठीण प्रसंगी शासनाच्या आणि पोलीस विभागाच्या मदतीसाठी सज्ज असतात ,सबब प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन यांनी सन्मानपूर्वक आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मानसेवी आजी-माजी होमगार्डस जवानांना सेवेचेआव्हान केल्यास ते कर्तव्य सेवेसाठी मदतीला धावून येतील पुढील काही महिने शासनाच्या विविध विभागांना विशेषता पोलीस आणि वैद्यकीय विभाग यांना होमगार्डस स्वयंसेवकांची लाख-मोलाची मदत उपयोगी येईल त्या अनुषंगाने शासनाने शुद्धिपत्रक काढून महाराष्ट्र राज्यातील होमगार्डस सदस्यांना राष्ट्रीय आपत्ती सेवा कार्यास रूजू करून घ्यावे, म्हणून मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ अनव्ये या राज्यांमध्ये मानसेवी होमगार्ड संघटना अस्तित्वात तसेच मुंबई होमगार्ड नियम १९५३अनव्ये या संघटनेसाठी नियम विहित करण्यात आलेले आहेत.
 
होमगार्ड संघटनेचा मूळ उद्देश नागरिकांचे वित्त व जीवित मालमत्तेचे संरक्षण करणे स्वयं शिस्त व मानवी नैसर्गिक आपत्ती काळामध्ये शासनास मदत करणे व पोलीस दलास कायदा व सुव्यवस्थेबाबत मदत करणे हा आहे होमगार्ड संघटना ही मानसेवी संघटना आहे .राष्ट्रसेवा करण्याच्या उद्देशनाने नागरिक संघटने मध्ये भरती होऊन प्रशिक्षण घेऊन शासनाच्या आदेशाप्रमाणे कर्तव्य बजावत असतात. संघटनेचा कारभार सुरळीत चालावा म्हणून महाराष्ट्र शासनाने महासमदेशक होमगार्ड हे पद निर्माण करून त्यांच्या आधिपत्यखाली कामकाज चालते तसेच वेळोवेळी शासनाचे गृह विभागाने विविध नियम व नियमावली करून होमगार्ड संघटनेचा कारभार सुरळीत चालावा म्हणून जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हा समदेशक होमगार्ड हे मानसेवीपद निर्माण करून त्या पदावर योग्य व पात्र व्यक्तींची निवड करून जिल्हा कार्यालयाचा कारभार त्यांच्या अभिपत्या खाली सन १९४७ ते २०१४ पर्यंत चालू होता.
 
होमगार्ड संघटना ही मानसेवी सदस्यांची संघटना आहे.स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने संघटनेमध्ये भरती होऊन नियमाप्रमाणे प्रशिक्षण घेऊन महासमदेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे राज्यातील जिल्हाधिकारी यांनी सण २०१४-२०१५ मध्ये रिक्त जागेवर जिल्हासमदेशक होमगार्ड मानसेवी या पदाचे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते.त्या प्रमाणे अर्ज ही दाखल झालेले आहेत त्यानंतर समिती नेमून उमेदवारांची मुलाखत घेऊन त्याची निवड करून शासनाच्या गृह विभागास कळविणे अत्यावश्यक असताना तसे त्यांनी त्यांचे कर्तव्ये पार पाडले नाही अथवा महा.शासनाच्या मान्यतेने दिलेली जाहिरात आजपर्यंत रद्द केलेली नाही.
 
महासमदेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दि.११/१२/२०१८ रोजी यांनी मध्ये जिल्हा समदेशक हे मानसेवी पद रद्द करून वेतनीय करणे बाबतचा प्रस्ताव शासनाच्या गृह विभागात पाठविले त्या पत्र क्र मस/कार्य/ २/२०१८/३५५३ अनव्ये प्रस्ताव पाठविला त्या प्रस्तावाच्या आनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखाली समिती नेमून दि,०१/०३/१९ बैठक संपन्न झाली. त्या बैठकी मध्ये जिल्हा समदेशक होमगार्ड हे मानसेवी पद रद्द करून त्या ऐवजी ते पद वेतनीय करण्याचा निर्णय झाला. परंतु सदरचा निर्णय चुकीचा व मानसेवी होमगार्ड संघटनेच्या विरुद्ध असल्याने महाराष्ट्र शासनाचे वित्त व सामान्य प्रशासन विभागाने अद्याप मान्यता दिलेली नाही. ज्या सदस्यांनी होमगार्ड संघटनेमध्ये अल्प मानधनावर सेवा दिली. त्यांच्या कार्याचा विचार उपसमिती यांनी केलेला नाही. याउलट पक्षी उपसमिती होमगार्ड संघटनेचे कोणतेही सदस्य उपस्थित नव्हते. २०१४ पासून जिल्हा समदेशक या मानसेवी पदाचा पदभार अति,पोलिस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आलेला आहे. यामुळे मानसेवी होमगार्ड संघटनेचे काम विस्कळीत व मोडकळीस आलेले आहे. याचा परिणाम संघटनेतील माजी सदस्यांवर झालेला आहे. सन २०१६ पासून नवीन सदस्यांची भरती पदोन्नती कर्तव्ये (बंदोबस्त) बजावणे व मागणी प्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आदी कामे राज्यामध्ये ठप्प झालेली आहेत.
 
तरी पूर्ववत सेवा सुरळीत करण्याबाबत होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ४ (१)(२)ब प्रमाणे पुर्वरत जिल्हा समदेशक होमगार्ड हे मानसेवी पद निर्माण करावे म्हणजेच मागील शासन निर्णय क्र एचजीएस २०१९/प्रत/क्र ३८/विशा ८ मंत्रालय मुंबई २० जून २०१९ चा निर्णय रद्द करण्यात यावा. त्याच प्रमाणे जिल्हा व राज्य प्रशासनाने शुद्धीपत्रक काढून सेवा पूर्ववत करण्यात यावी. असे मी समस्त होमगार्ड सदस्यांच्या वतीने विनंती पूर्वक निवेदन सादर करीत आहे.
 
याबाबत केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने देशातील व राज्यातील आपत्ती जन्य परिस्थिती विचारात घेऊन समस्त मानसेवी होमगार्ड सदस्य आजी-माजी यांना सन्मानपूर्वक कर्तव्य सेवेसाठी मीडियाच्या माध्यमातून निमंत्रित करावे. त्यांच्या सेवेचा नागरिकांच्या हिताकर्ता लाभ करून घ्यावा.अशी सत्ताधारी सर्व जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार,आमदार,नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,देवस्थान विश्वस्त याची होमगार्ड संस्था सेवाभावी असल्याने जिल्ह्यातील स्वयंसेवकांना कार्यरत करुन घेण्याबाबत मागणी करीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: देवेंद्र फडणवीसांची पक्षनेतेपदी निवड केली जाईल म्हणाले सुधीर मुनगंटीवार

लातूर मध्ये जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक

काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुणे न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल! आज ना उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार

'देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री', शपथविधीपूर्वी नागपुरात लावले पोस्टर्स

पुढील लेख
Show comments