Dharma Sangrah

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून

Webdunia
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारी ऐवजी २५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तशी विनंती राज्यपालांना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला सादर होणार आहे.
 
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताना शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १८ फेब्रुवारीपासून सुरु होईल असे विधिमंडळात जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते आता २५ पासून सुरू करावे, अशी विनंती वित्त विभागाकडून करण्यात आली होती.
केंद्र सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याने राज्य सरकारही संपूर्ण वर्षभाराचा अर्थसंकल्प फेब्रुवारीतील अधिवेशनात सादर करू शकणार नाही. त्यामुळे राज्याकडूनही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. याआधी २००९ व २०१४ या निवडणूक वर्षात तत्कालीन सरकारनेही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

भाविकांनी भरलेल्या ट्रॉलीला ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने डॉक्टर असल्याचे भासवून कौन्सलिंगच्या नावावर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली

LIVE: NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील एका ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

नीट यूजी परीक्षा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढील लेख
Show comments