Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य सरकारकडून शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर

राज्य सरकारकडून  शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (20:14 IST)
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आणि नियमावली बंधनकारक असल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. यासंदर्भात गृह मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. 
 
1. यंदा गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी
2. मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये
3. केवळ 10 व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये. 
4. आरोग्यविषय उपक्रमे आणि शिबीर यांची जनजागृती करावी
5. सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियम पाळण्याकडे अधिकचे लक्ष द्यावे
6. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
 
मिरवणुकीला परवानगी नाही 
 
शिवजयंतीनिमित्त राज्यभरात गावापासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते. परंतु, सार्वजनिक ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, किर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सूचवले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इमरान खान यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्याची भाषा करून पायावर धोंडा पाडून घेतला आहे का?