Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर दगडफेक, 10 पोलिस जखमी

Webdunia
शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (09:58 IST)
महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आंदोलक अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर दगडफेक केली. यामुळे अनेक पोलीस जखमी झाले असून दगडफेकीत पोलिसांच्या अनेक वाहनांचे आणि दुचाकींचे नुकसान झाले आहे. जमावाला थांबवण्याकरिता पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याशिवाय पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, यूपीचे महंत यती नरसिंहानंद महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरूंविरोधात दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये तणाव वाढला आहे. तसेच शनिवारी अल्पसंख्याक समाजातील लोकांनी नागपुरी गेट पोलिस स्टेशनला घेराव घालून कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने केली. काही हल्लेखोरांनी पोलिस स्टेशन आणि तेथे उपस्थित पोलिसांवर दगडफेक केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले आहे. तसेच जमावाने पोलिसांच्या चार ते पाच मोठ्या वाहनांची आणि 10 ते 15 मोटारसायकलींची तोडफोड करून नुकसान केले आहे.
 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवला आणि जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. सुमारे तासभराच्या गोंधळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 
 
या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांचा शोध सुरू केला आहे. सर्व प्रमुख पोलीस अधिकारी आणि अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे पथकही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असून लवकरच वातावरण बिघडवणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

5th October World Teachers Day 2024: भारत का साजरा करतो शिक्षक दिन, जाणून घ्या

राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कोल्हापुरात संविधान वाचवा परिषद घेणार

PM Modi आज महाराष्ट्र दौऱ्यावर, अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

पुढील लेख
Show comments