Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनोखी टोळी गजाआड, वाहने अडवुन कोंबडया लुटणारी टोळी पकडली

अनोखी टोळी गजाआड, वाहने अडवुन कोंबडया लुटणारी टोळी पकडली
, मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (08:35 IST)
नाशिक ग्रामीण पोलिसांनी अनोखी चोरांची टोळी पकडली आहे. ही टोळी  कोंबड्या चोरणारी टोळी आहे. याबाबत सविस्तर बातमी अशी की, वावी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०४/०९/२०२० रोजी मध्यरात्रीवे सुमारास सांताकुम, मुंबई येथील वाहन चालक नामे फिरोज सफि खान हे त्यांचेकडील पिकअप वाहन क.एम.एच.०४.जे.के.८४४८ या वाहनात कोंबडया भरून घेऊन जात असतांना नांदुरशिंगोटे ते सिन्नर बायपास रोडवर अज्ञात ०५ इसमांनी ०२ मोटर सायकलींवर येवुन पिकअप गाडीस मोटरसायकली आडव्या लावुन चालक व क्लिनर यांना चॉपरचा धाक दाखवुन मारहाण करून ६०० कोंबडया भरलेली पिकअप, ०३ मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण ०१ लाख ४६ हजार १०० रूपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन जबरीने घेवुन गेले.
 
याबाबत वावी पोलीस ठाणेस । गुल्हा रजि.नंबर -४२५/२०२० भादवि कलम ३९५,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासुन वावी परिसरात कंपनीच्या कोंबड्यांच्या गाडयांना रात्रीचे सुमारास आडवुन त्यांमधील जिवंत कोंबडया व किंमती ऐवज लुटण्याचे प्रकारात वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य व्यावसायीकांसह शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या मा.पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह मॅडम यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्हयांचा समांतर तपास सुरू केला होता. सदर गुन्हयातील चोरून नेलेल्या कोंबडया पांगरी, ता.सिन्नर येथील १) रविंद्र गोरख शिरसाठ, २) आकाश सुर्यभान शिंदे यांनी विकत घेतल्याचे समजल्यावरून वादी पोलीसांनी त्यांना अटक केली होती. 
 
सदर गुन्ह्यात  अटक आरोपीनी कयुली दिलेवरून त्यांचे साथीदार नामे प्रविण उर्फ भैय्या कांदळकर, अमर कापसे, विवेक खालकर व चैतन्य शिंदे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्हा घडल्यापासुन सदर आरोपी हे फरार होते. स्थानिक गुन्हे शोध   पथकाने सदर गुन्हयावे समांतर तपासात नाशिक शहरातील जत्रा हॉटेल परिसरातुन आरोपी नामे ३) प्रविण गोरक्षनाथ कांदळकर उर्फ भैय्या, वय २१, रा.शहा, ता.सिन्नर,अमर घोंडीराम कापसे, वय १८, रा.भेंडाळी, ता.निफाड,५) विवेक नवनाय खालकर, वय १८, रा, भेंडाळी, ता.निफाड, ६) वैतव्य राजेंद्र शिंदे, वय १९, रा.पांगरी, ता.सिन्नर यांना ताब्यात घेतले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात विवाह समारंभांसाठी नव्याने आदेश जाहीर, अशी आहे नियमावली