Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदेश दिला की एक तासही सत्तेत न राहता राजीनामा देऊ :देसाई

Webdunia
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (08:46 IST)

शिवसेना २०१९ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे, ही काळ्या दगडावरील भगवी रेघ आहे. पक्षाने आदेश दिला की, शिवसेनेचे सर्व मंत्री एक दिवस काय, एक तासही सत्तेत न राहता राजीनामा देतील, असा विश्‍वास शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  व्यक्त केला आहे.   चिंचवड येथील लघुउद्योजकांच्या प्रदर्शनानिमित्त आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. 

देसाई म्हणाले की, राजीनामा देण्याबाबत पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. सरकारच्या कामगिरीबद्दल ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला तीन वर्षे झाली आहेत. यामध्ये प्रयत्न नक्की झाले आहेत; परंतु सगळे समाधानी आहेत, असे म्हणता येत नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेची मागणी होती, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. काही गोष्टींत त्यांनी प्रयत्न केले असून, त्यामध्ये त्यांना यश यावे, या शुभेच्छा आहेत असे सांगितले आहे. 

 

संबंधित माहिती

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments