Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख वसंत दिनकर मेस्त्री यांचे निधन

सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख वसंत दिनकर मेस्त्री यांचे निधन
, शनिवार, 8 एप्रिल 2023 (21:33 IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर- सडेवाडी सुपुत्र तथा सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेचे प्रमुख वसंत दिनकर मेस्त्री (वय वर्षं ५४) यांचे मुंबई येथील कांदीवली निवासस्थानी नुकतेच निधन झाले. देशविदेशातील पन्नास हजारहून विद्यार्थ्यांना घडवून करिअरच्या यशस्वी उंचीवर नेणारे वसंत मेस्त्री शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी,दोन भाऊ, बहिण, वहिनी असा परिवार आहे.
 
मालवण तालुक्यातील चिंदर – सडेवाडी येथे वसंत मेस्त्री यांचा जन्म १ जून १९६८ रोजी झाला. वसंत मेस्त्री यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून गरूड भरारी घेतली.  घरची परिस्थिती गरीबीची आणि आई वडिल अशिक्षित होती. आई वडिलांनी दिवस रात्र मेहनत करून मुलाच्या स्वप्नांना बळ दिले. वसंत मेस्त्री यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत  शिक्षणाचे  स्वप्न पूर्ण करून दाखवले.शिक्षणानंतर मुंबई येथे काही वर्षे नोकरी देखिल करून अहोरात्र कष्ट केले.
 
पुढे मुंबई येथे सांताक्रूझ आनंद नगर ला सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. विशेषतः पाईपिंग इंजिनिअरींगचे ट्रेनिंग या प्रशिक्षण केंद्रात दिले जात होते. देश विदेशातील बलाढ्य कंपन्यामध्ये हे प्रशिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या इंजिनिअर यांची मोठी मागणी आहे.त्यामुळे देशविदेशात वसंत मेस्त्री हे प्रशिक्षक म्हणून कायम दौऱ्यावर असायचे. या निमित्ताने वसंत मेस्त्री यांनी अनेक देशांत जाऊन देखिल मार्गदर्शन केले आहे.अभ्यासक, मार्गदर्शक म्हणून त्यांना विदेशात मागणी होती. गेल्या अनेक वर्षात वसंत मेस्त्री यांनी पन्नास हजार विद्यार्थी प्रशिक्षित करून त्यांचे यशस्वी करिअर घडविले. कोकणच्या सुपुत्राने शिक्षण आणि करिअर क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. सांताक्रूझ येथील सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण देश विदेशातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे नावलौकिक देशविदेशात पोहचविले .आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.नॅशनल इंटिग्रेशन अॅण्ड इकॉनॉमिक संस्थेचा राजीव गांधी शिरोमणी अवार्ड,सिटीझन इंटिनेश पीस सोसायटी संस्थेचा इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अॅवार्ड, ऑल इंडिया अॅचिव्हर्स फाउंडेशन संस्थेचा शिक्षा भारती पुरस्कार, वर्ल्ड इकॉनॉमिक प्रोग्रेस सोसायटी संस्थेचा नॅशनल अॅचिव्हमेंट अवार्ड फॉर एज्युकेशन, यासह विविध संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.टी.व्ही. चॅनल,आकाशवाणी अश्या विविध वाहिन्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले आहे.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्कील कॉउन्सिलच्या चेअरमनपदी ते कार्यरत होते.
 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसाठी आत्तापासून सुरुवात करावी; तंत्रशिक्षण विभागाची सूचना