rashifal-2026

दोन अल्पवयीन मुलींची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

Webdunia
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (16:31 IST)
मुंबईतील गोरेगावमधील आरे कॉलनीत दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. दोन्ही मुली या १७ वर्षांच्या असून त्या शाळेत शिकत होत्या. प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
 
अनिता पाड्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या दोन मुली या चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींनी मंगळवारी संध्याकाळी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दोघींनी मोबाईलवर सेल्फी काढला आणि तो मित्रमैत्रिणींना पाठवला. यातील एकीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला होता. ‘आम्ही आत्महत्या करत आहोत’, असा मेसेजही त्यांनी फोटो पाठवताना केला होता, असे समजते. हा प्रकार समजताच स्थानिकांनी त्यांना बाहेर काढले. दोघींना तातडीने सिद्घार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींचाही मृत्यू झाला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांचे जेट उडवणारे कॅप्टन सुमित कपूर कोण होते? त्यांना लिअरजेट्सचे तज्ज्ञ मानले जात असे

LIVE: अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे हजारो लोकांची गर्दी

पंतप्रधान मोदी म्हणाले की अजित पवार यांनी नेहमीच गावकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी आघाडीवर काम केले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनातील ४ किस्से

अजित पवार यांचे निधन; अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे हजारो लोकांची गर्दी

पुढील लेख
Show comments