Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वच्छ व सुरक्षित मुंबई हे माझे स्वप्न -सुप्रियासुळे

Webdunia
सोमवार, 30 जानेवारी 2017 (13:48 IST)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसेच्या खा. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अनेक मुद्द्यांवर सुळे यांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. मुंबईचा विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय असून स्वच्छ, सुंदर, हरित मुंबईसाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असेल, हे सुळे यांनी स्पष्ट केले. मुली-महिला यांच्यासाठी मुंबई शहर अधिक सुरक्षित व्हावे, हे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेत सत्तेत आल्यास मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये स्वच्छतागृहे व शौचालये उभारण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल, असेही त्या म्हणाल्या. मुंबईत सत्ता मिळाल्यास हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई जिथे जिथे राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे तिथे अतिशय चांगले काम पक्षाने केले आहे. मुंबईमध्ये पण आम्ही चांगला बदल आणि सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments