Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा तर ‘भ्रम’संकल्प : सुप्रिया सुळे

हा तर ‘भ्रम’संकल्प  :  सुप्रिया सुळे
, गुरूवार, 1 फेब्रुवारी 2018 (15:40 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा ‘भ्रम’संकल्प असल्याची टिका ट्विटवरून केली आहे.सामान्यांशी संबंधित अनेक गोष्टींना या अर्थसंकल्पात बगल देण्यात आल्याची टिका सुप्रिया सुळेंनी ट्विटवरून केली आहे. या अर्थसंकल्पात बड्यांच्या कर्जवसुलीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही असे सुळे यांनी केलेल्या  ट्विटमध्ये म्हटले आहे.

सामान्यांसाठी महत्वाचा असणाऱ्या पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी, शेतीला कर्ज मिळण्यासाठी, बँकांचे चार्जेस कमी करण्यासाठीही काहीच तरतूद केली नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मोदी सरकारवर यावरुनच टिका करत त्यांनी पुढे सरकार मोठे मोठे आकडे दाखवते आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रांमध्ये अडकवायचे असंच करत असल्याची टिका केली आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बजेटचे केले विटंबन, ट्विटरवर झाले ट्विपल्स ‘हास्यसंकल्प’ सादर