शिवसेना (ठाकरे गट) नेते खा. संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीतून सुटका झाली. यावर शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी Tiger Is Back असे ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शिवसेना कुटुंबातील एक लढवय्या सदस्य ज्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केले गेले पण ते लढले आणि त्यांना जामीन मिळतोय. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे असे मत अंधारे यांनी यावेळी व्यक्त केले. मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही असे ठामपणे सांगणारा आमचा नेता परत आला आहे असे सांगताना त्या भाऊक झाल्या.
यावेळी अंधारे म्हणाल्या, बाळसाहेबांचा लढाऊ सरदार हा कधीही हात टेकत नाही, तो फक्त लढतो. बाळासाहेब ठाकरे यांचा लढाऊ सरदार कसा असावा याचा आदर्श संजय राऊत यांनी घालून दिला असल्याचे अंधारे यावेळी म्हणाल्या. जे सुखात सोबत असतात ते इतके खरे नसतात पण जे दुःखात साथ देतात ते खरे असतात असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेतून बाहेर गेलेल्या 40 आमदारांना लगावला.
विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला! भाजप लढवणार सर्वाधिक जागा; शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादीला किती मिळणार?
LIVE: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्यात इंधनाचा पुरेसा साठा
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला अटक केली
छगन भुजबाळ यांनी "राज्यात केवळ महिनाभर पुरेल इतकाच पेट्रोल-डिझेलचा साठा" वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली; मात्र फडणवीस यांनी "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका स्पष्टीकरण दिले
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात: कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी दुभाजकाला धडकली; दोन वृद्धांचा जागीच मृत्यू