शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संसद घेराव आंदोलन करणार आहे. यासाठे 'स्वाभिमानी एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली.
कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून अधिक स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. शुक्रवार (३०नोव्हेंबर) व शनिवार (१डिसेंबर) दिल्लीतील संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील २१० संघटनांचा सहभाग असून स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.या विशेष रेल्वेस १८ डबे असून १५ बोगी, २ जनरल डबे, १ भोजनाची व्यवस्था अशी 'स्वाभिमानी एक्स्प्रेस’ या विशेष रेल्वेची रचना आहे.