Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक! शिक्षकानेच शिक्षकाला दगडाने ठेचून मारले

Webdunia
गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (09:28 IST)
उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून शिक्षकानेच दुसऱ्या शिक्षकाला दगडाने ठेचून खून केला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी शहरातील भगिरथी कॅालनी परिसरात घडली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. श्यामराव देशमुख असे हत्या करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भोसले हायस्कूलमध्ये श्यामराव देशमुख आणि धीरज हुंबे असे शिक्षक पदावर कार्यरत होते. हे दोघे एकाच शाळेत असल्याने त्यांची एकमेकांसोबत चांगली ओळख आहे. या ओळखीतून दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण सुरू असायची. मात्र, काही व्यवहार फसल्याने दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले, त्यात त्यांचे घटनेच्या दिवशी तसेच भांडण झाले, मात्र हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, त्यातून त्यांच्यात मारहाण झाली. यात श्यामराव देशमुख यांना धीरज हुंबे याने दगडाने ठेचून मारायला सुरुवात केली, यात श्यामराव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले, त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी मयत शिक्षक श्यामराव देशमुख यांचा मुलगा वैभव देशमुख याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून अनेकांना धक्का बसलाय.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: नाना पटोले, अजित पवार, एकनाथ शिंदे पुढे

5 कोटींच्या आरोपावरून विनोद तावडेंवर कारवाई, राहुल-खर्गे यांना पाठवली 100 कोटींची नोटीस

20 हजारांच्या फरकाने विजयाचा दावा करत आहेत शिवसेना नेते मुरजी पटेल

लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद झाला, दुसऱ्या दिवशी अल्पवयीनने खून करून बदला घेतला

पुढील लेख
Show comments