Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसेकडून टीझर शेअर, महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज…’ असल्याचे टायटल

raj thackeray
शनिवार, 18 मार्च 2023 (21:56 IST)
येत्या गुढी पाडव्याला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अधिकृत या ट्विटर अकाऊंटवर एक टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर टीका केली आहे. या मेळाव्यासाठी  टिझर मनसेकडून लॉन्च करण्यात आल आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे.
 
चाळीस सेकंदा टीझर ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या टिझरमध्ये सुरुवातीला विधानभवनाच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या आवाजात एक ऑडिओ सुरु आहे. या ऑडिओतील शब्द अक्षरात दिसत असून, त्यात म्हटलं की, गेले दोन अडीच वर्षे महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ना ही चांगली गोष्ट नाही बरं का…महाराष्ट्रासाठी! असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. हेच खरं राजकारणं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे राजकारण नव्हे! त्यानंतर पुढे राज ठाकरेंच्या फोटोसह ‘महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज…’ असल्याचं टायटल दिसतं. तसंच पुढे ‘चला शीवतीर्थावर!’ असं आवाहनही मनसेच्यावतीनं करण्यात आलं आहे.
 
“महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, २२ मार्च २०२३ सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई”, असे शेअर करण्यात आलेल्या टीझरला कॅप्शन देण्यात आले आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊत यांचे ट्वीट, भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप