rashifal-2026

त्र्यंबकेश्वरमधील तणाव निवळला, एसआयटी चौकशीचे आदेश

Webdunia
मंगळवार, 16 मे 2023 (21:41 IST)
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 10 ते 12 जणांच्या जमावाने शनिवारी रात्री बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाला होता. या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. संबंधित युवकाला रविवारी सकाळीच नोटीस बजावण्यात  आली. पोलीस आणि मंदिर सुरक्षारक्षकांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळल्यावर तणाव निवळला. आता त्र्यंबकेश्वर शहर अथवा मंदिरात कोणताही तणाव नाही, असे पोलिसांनी सांगितले.
 
याआधी त्र्यंंबकेश्वर पुरोहित संघ ब्राह्मण महासंघ मराठा, महासंघ यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना निवेदन दिले आहे. दरम्यान  त्रंबकेश्वर पोलिसांनी दोन्ही समाजातील घटक तसेच शांतता समिती यांची बैठक घेतली. 
 
दुसरीकडे  या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची  चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात 
मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीड जिल्ह्यात नववीच्या एका विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments