Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार झालीय : किशोरी पेडणेकर

जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार झालीय : किशोरी पेडणेकर
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (17:19 IST)
जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार झालीय. अनधिकृत बांधकाम सुरू असताना ३५४ अ अंतर्गत २४ तास अगोदर नोटीस दिली होती असे त्या म्हणाल्या. अभिनेत्री कंगना राणौतच्या घर, कार्यालयावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलंय. यावर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.  
 
कारवाई सुडापोटी केली असेल तर मग त्या नटीनं पीओके म्हणून जो अपमान मुंबईचा केला, त्यावर कुठल्या कोर्टात दाद मागायची ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
 
एमएमसी कायद्यानुसार कारवाई करा असं कोर्टानं यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे. मग कंगना प्रकरणात काय उणिवा राहिल्या ? त्या पाहू, असे त्या म्हणाल्या. कोर्टाच्या निर्णयावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. कंगनालाच ही नोटीस पहील्यांदा दिलीय, असं नाही. अशा अनेक नोटीसा पूर्वी दिल्या गेल्या आहेत. मग आताच असं काय झालं ? या निर्णयाचा परिणाम संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बांधकामांसंदर्भात होईल असे किशोरी पे़डणेकर म्हणाल्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: प्रथम ते बारावीचे विद्यार्थी दहा दिवस बॅगशिवाय जातील