Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्ट ऑफ लिव्हिंगचे दुष्काळी लातुरात मोठे काम, आता ही नदी करत आहेत पुनर्जीवीत

आर्ट ऑफ लिव्हिंगचे दुष्काळी लातुरात मोठे काम, आता ही नदी करत आहेत पुनर्जीवीत
, सोमवार, 27 मे 2019 (10:10 IST)
लातूर येथील दुष्काळ सर्व राज्याने आणि देशाने पाहिला आहे. लातूरमध्ये सर्वाधिक पाण्याचे दुर्भिक्ष आहे. मात्र यावर मात करायचे प्रयत्न जोरदार सुरु आहेत. देवणी येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून देव नदीचे पुनर्जीवन चे काम चालू आहे. 
 
या कामास उदगीर उपजिल्हाधिकारी श्री अरविंद लोखंडे, तहसीलदार मुंडे, देवणी तहसीलदार सुरेश घोळवे, उदगीर नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विद्या लोखंडे, उदगीर पंचायत समिती गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, जलसंधारण विभागाचे अभियंता शेख व महसूल, पंचायत समिती नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. सोबतच बसवराज पाटील नगराळकर, रमेश अंबरखाने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प समन्वयक महादेव गोमारे यांनी उपस्थितांना प्रकल्पाची माहिती दिली. 
 
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सात नद्यांचे पुनर्जीवन काम झाले आहे. या वर्षी दुष्काळग्रस्त देवणी तालुक्यातील देव नदीच्या कामास नगराळ गावातुन प्रारंभ करण्यात आला आहे. देवनदीचे लातूर जिल्ह्यात तीस किलोमीटरचे पात्र आहे. उदगीर आणि देवणी तालुक्यातील देव नदी ही या भागाची जीवनदायिनी आहे. सदर कामचा उदगीर आणि देवणी तालुक्यातील पन्नास गावांना त्याचा फायदा होणार आहे. या नदीवर जागोजागी साखळी पद्धतीने गॅबियन बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. 
 
यामुळे या नदीचे तीस किलोमीटरचे पात्र पूर्णपणे पाण्याने भरून राहणार आहे. नदीचे रुंदीकरण आणि मधील गाळाचा उपसा केल्यामुळे नदी पात्रात जास्तीचे पाणी थांबवून परिसरात परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. एकूणच तालुक्यातील खालावलेली पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे परिसरातील बंद पडलेले बोअरवेल कोरड्या विहिरी पाण्याने परत भरण्यास मदत होणार आहे. तसेच या परिसरातील शेतकऱ्यांना कमी पाण्यात उत्पादन देणारी पीक पद्धती, नैसर्गिक शेती, हमखास उत्पन्न देणारे वृक्ष लागवड यांचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू