Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खोलीमध्ये सडत राहिला मृतदेह...महिला कबड्डी प्लेयरची कोच ने च का केली हत्या?

Webdunia
बुधवार, 29 मे 2024 (12:24 IST)
महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एक कबड्डी कोच ने एक महिला खेळाडूची हत्या केली आहे. गेल्या आठवड्यात गुरवारी कोच ने हे हत्याकांड घडवून आणले आणि इतर कोच कडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी संध्याकाळी 23 वर्षाचा कोच गणेश गंभीर राव याला ताब्यात घेतले. 
 
नवी मुंबई मधून अटक केलेल्या राव ला कलाम 302 नुसार अटक करण्यात आली. राव याने पोलिसांजवळ कबुली दिली की त्यानेच खेळाडू महिलेची हत्या केली. कोच म्हणाला की तो त्या महिला खेळाडूवर प्रेम करायचा व त्याला संशय आला होता की ही महिला खेळाडू दुसऱ्यासोबत बोलते. डोक्यात राग घालून या कोच ने ही हत्या घडवून आणली. 
 
17 वर्षाची ही महिला खेळाडू विद्यार्थिनी असून ती ठाणे मधील कोलशेटमध्ये आपली आई आणि भावासोबत भाड्याच्या घरात राहत होती. अधिकारींनी सांगितले की, दोन ते तीन दिवसांपासून ही खेळाडू एकटी होती कारण तिचा भाऊ आणि आई गावाला गेले होते. रविवारी शेजारच्यांनी तिच्या खोलीमधून दुर्गंध यायला लागला. यानंतर शेजारच्यांनी घरमालकाला सूचना दिली. ज्याने आल्यानंतर दार उघडले तर मृतदेह मिळाला. पोलिसांना लागलीच सूचना देण्यात आली. पोलिसांनी मृत्यूची नोंद दाखल केली. ती एका शाळेमध्ये शिकत होती व तिला कबड्डी मध्ये करियर करायचे होते. 
 
ती कमीतकमी दोन वर्षांपासून राव याच्या अंडर ट्रेनिंग घेत होती, जो स्वतः राज्य स्तरावर कबड्डी खेळाला आहे. 23 मे ला जेव्हा खेळाडू घरी होती, तेव्हा हा आरोपी घरात अचानक शिरला व त्याला संशय आला की ती कोणाशी तरी बोलत आहे. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. आणि शेवटी त्याने तिची हत्या केली. या आरोपीने या विद्यार्थिनीचा गळा दाबला आणि मग गळ्यावर कात्रीने सपासप वार केले.यानंतर तो घराचा दरवाजा बंद करून फरार झाला. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला 6 जून पर्यंत पोलीस रिमांड मध्ये पाठवण्यात आले आहे.  
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सारणमध्ये पूल कोसळून भीषण अपघात, गंडक नदीवरील पूल कोसळला

भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये या दिवशी होऊ शकतो

पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत सुमित नागलला मोठा धक्का, स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर

लहानपणापासून सोबत असलेल्या जोडप्याने आयुष्य एकत्रच संपवण्याचा निर्णय का घेतला?

झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा,हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

सर्व पहा

नवीन

राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआऊट, शरद पवार म्हणाले विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले नाही

मुंबई विमानतळावर 2.50 कोटी रुपयांचा गांजा पकडला, आरोपीला अटक

या देशात पुरुष लिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले; एका दशकात 6,500 रुग्णांचे लिंग काढले

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

Zika Virus: झिका व्हायरसबाबत अलर्ट, केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी ॲडव्हायझरी जारी केली

पुढील लेख
Show comments