हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे आहे कारण

मंगळवार, 25 जून 2019 (16:52 IST)
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ करावा, अशी प्रत्येक आई -वडिलांची अपेक्षा असते. किंबहुना ते मुलांचे कर्तव्य असते. मात्र, अनेकदा मुले कृतघ्न निघतात. असाच प्रकार पुणे येथे घडला आहे. जेवण कमी पडले म्हणून मुलाने आपल्या आईला जबर मारहाण केल्याची घटना कोंढव्यात घडली. मुलाच्या या प्रकाराने त्रासलेल्या वडिलांनीच आपल्या मुलाविरुद्ध कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या नराधम मुलाचे नाव रवि चंद्रकांत सरतापे (वय ३०, रा़ नताशा एनक्लेव्ह, एनआयबीएम रोड, कोंढवा) असे आहे. त्याचे वडिल चंद्रकांत विठ्ठल सरतापे (वय ५९) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नताशा एनक्लेव्ह येथे घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सरतापे यांना तीन मुले आहेत. रवि सर्हावात लहान आहे. तो एका कंपनीत कामाला आहे. त्यांच्यात नेहमीच घरगुती कारणावरुन भांडणे होत असतात. तो रात्री उशिरा घरी आला होता. तेव्हा घरात जेवण कमी पडले. त्यामुळे चिडलेल्या रवीने आपल्या आईला फरशी पुसायच्या मॉपने पाठीवर, तोंडावर तसेच गालावर काठीने जबर फटके मारले आहेत. त्यावेळी आईला सोडवायला मोठा मुलगा राज हा मध्ये पडल. तेव्हा त्यालाही शिवीगाळ करीत मारहाण करुन जखमी केले आहे.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन...