Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यार्थ्यांच्या भरधाव बसचे ब्रेक अचानक फेल, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

विद्यार्थ्यांच्या भरधाव बसचे ब्रेक अचानक फेल, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला
, रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (16:14 IST)
''देव तारी त्याला कोण मारी''  हे आज प्रत्यक्षात दिसून आले. पुणे जिल्ह्यात भोरमधील चौपाटी परिसरात बारामतीतील मोरगाव येथील एका खासगी शिक्षण वर्गातील काही विद्यार्थी रायगड किल्यावर सहलीला जाण्यासाठी बसने निघाले बस मध्ये एकूण 34 विद्यार्थी होते.बस वरंधघाट मार्गे निघाली असता पुण्याच्या भोर चौपाटी परिसरात बसचे ब्रेक फेल झाले. ही बाब बस चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रसंगवधान राखून रस्त्यावरील नागरिकांना सावध केले  आणि चालत्या बस मधून उडी मारून चाकाखाली दगड टाकून बस थांबवून बस नियंत्रणात आणून मोठा अनर्थ टाळला. 
हा सर्व चित्तथरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहे. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस मधील 34 विद्यार्थ्यांचे प्राण वाचवल्या बद्दल बस चालकाचे कौतुक केले जात आहे. 

Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chinese App ban: भारत सरकारने 200 हून अधिक चीनी लिंक्ड मोबाइल अॅप्सवर बंदी घातली