Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारु पिऊन भांडणे करतो म्हणून भावाने केला भावाचा खून

दारु पिऊन भांडणे करतो म्हणून भावाने केला भावाचा खून
, शुक्रवार, 7 मे 2021 (15:57 IST)
दारु पिऊन भांडणे करतो, पैशावरून वाद घालतो म्हणून भावाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केला. ही घटना मोशी येथे  घडली. मनोज ज्ञानेश्‍वर बोऱ्हाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. यशवंत गुलाब केंजळे (वय 51, रा. संगमवाडी, खडकी, पुणे) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय ज्ञानेश्‍वर बोऱ्हाडे (वय 22, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे खूनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावाचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मनोज हा नेहमी दारु पिऊन घरी येत असे. घरातील व्यक्‍तींशी भांडण करीत असे. तसेच पैशावरून वाद घालत असे. वारंवारच्या भांडणाला बोऱ्हाडे कुटुंबिय कंटाळले होते. गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास मनोज याने घरी भांडण सुरू केले.
 
यावेळी संतापलेल्या आरोपी अक्षय याने धारदार शस्त्राने मनोज यांच्यावर वार केले. जखमी अवस्थेत असलेल्या मनोज याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियाला बदली