Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marriage Anniversary Wishes In Marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Anniversary wishes
या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने 
माझी एकच प्रार्थना आहे, 
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव, 
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं, 
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं. 
हॅपी अॅनिव्हर्सरी टू लव्हली कपल
 
उगवता सूर्य, बहरलेले फुल
उधळलेले रंग,
तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….
 
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत 
हीच प्रार्थना आहे देवाकडे 
हॅपी अॅनिव्हर्सरी 
 
तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,
रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.
 
तुमची जोडी राहो अशी सदा कायम 
जीवनात असो भरपूर प्रेम कायम, 
प्रत्येक दिवस असावा खास 
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
 
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो 
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
 
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
 
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम 
 
आपण दोघे आमच्यासाठी खास आहात,
जे आमच्या आनंदात रंग भरतात,
तुम्ही नेहमी आनंदात राहो,
हीच परमेश्वराला प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,
प्रेमाची ओढ लागू द्या,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,
तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्यावे का?