Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी

Webdunia
शनिवार, 6 जानेवारी 2024 (12:37 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळीच तपास यंत्रणेने पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणेच्या पथकाने बारामती अ‍ॅग्रोची संबंधित एकूण सहा ठिकाणी धाड टाकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. बारामती अॅग्रोवर ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. बारामती अॅग्रो कंपनी ही आमदार रोहित पवार यांची आहे.
 
शुक्रवारी सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेने बारामती अॅग्रोवर धाड टाकली आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून बारामती अॅग्रोसह सहा ठिकाणी झाडाझडती केली जात आहे. बारामती अॅग्रो या कंपनीत रोहित पवार हे कार्यकारी संचालक आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार हे अध्यक्ष आहेत. केंद्राचे तपासणी पथक सकाळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासणी सुरु केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हे पथक ईडीचे आहे की कोणत्या दुसऱ्या तपास यंत्रणेचे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments