Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतात दोन हेलिपॅड उतरतात असा राज्यातला एकमेव शेतकरी म्हणजे मुख्यमंत्री.

Webdunia
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (08:41 IST)
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे  हे सध्या शिवसंवाद यात्रेनिमित्त राज्यातील अनेक गावांमध्ये भेट देत आहेत. यावेळी औरंगाबादमधील पैठण येथील बिडकीन येथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "न्याय आपल्या बाजूनेच होणार फक्त दोन-तीन महिने थांबा. आज नाहीतर उद्या हे ४० गद्दार राजकारणातून हद्दपार होणारच आहेत." असा विश्वास त्यांनी दर्शवला. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्यात असा एकमेव शेतकरी आहे, ज्याचा शेतात २ हेलिपॅड आहेत."
 
आदित्य ठाकरे म्हणाले की, "एकीकडे घाम गाळणारा शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहे, तर दुसरीकडे ज्यांच्या शेतात दोन हेलिपॅड उतरतात असा राज्यातला एकमेव शेतकरी म्हणजे मुख्यमंत्री. 'सत्तामेव जयते'ला महत्त्व नाही तर ‘सत्यमेव जयते’ला शिवसेना महत्त्व देते. कृषी व उद्योग हे डबल इंजिन आपल्याकडे आहे. 'ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा', या आमच्या मागणीनंतरही सत्ताधारी हे खुर्च्यांना पकडून राहिले आहेत. त्यामुळे त्यांना ओला दुष्काळ दिसला नाही," असे टीकास्त्र त्यांनी यावेळी सोडले.
 
पुढे ते म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट मदत ही शेतकऱ्यांना देण्यात आली होती. ज्या सुरतमध्ये गद्दार लपून बसले होते, त्या गुजरात सरकारचे आभार मानायला यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले. युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी असून ती टक्केवारीत अडकली आहे" अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments