Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोती तलावात कोसळलेल्या अल्पवयीन युवतीची ओळख पटली

Webdunia
गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (08:03 IST)
सावंतवाडीतील मोती तलावात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास एक युवती कोसळली होती . युवतीचा मृतदेह पाण्यात तरंगताना  बुधवारी सकाळी आढळून आला . मृतदेहाची ओळख पटली आहे . सदर युवती अल्पवयीन असून ती सावंतवाडी, न्यू खासकीलवाडा येथे राहते ती मूळ चंदगड येथील आहे. सावंतवाडीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात सदर युवती इयत्ता ११ वी मध्ये शिकत होती. सदर युवतीच्या आईला घटनेची माहिती कळताच धक्का बसला असून त्यामुळे फिट आल्याने त्यांची प्रकृतीही खालावली आहे .युवतीच्या आईला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . सदरची युवती पाण्यात पडली की तिने स्वतःहून उडी घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध सुरु होता . पण आज सकाळी मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला , दरम्यान नगपलिका , सामाजिक बांधिलकीचे सदस्य , नागरिक व पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आज यश आले.पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारच्या लव्ह जिहादविरुद्ध कायद्यावर संजय राऊतांनी केली टीका

राजस्थान येथील भारत - पाक सीमा लगत असणाऱ्या श्री तनोट राय माता मंदिर येथे साजरी होणार यंदा शिवजयंती.....

उपराष्ट्रपती यांनी कटरा येथे पोहोचून माता वैष्णोदेवीचे आशीर्वाद घेतले

काय सांगता, नागपुरातील लाडक्या बहिणींसाठी एवढ्या रुपयांत लाइफटाईम अमर्यादित पाणीपुरीची ऑफर

LIVE: मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मोठा खुलासा

पुढील लेख
Show comments