Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या घराबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (08:20 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर यांच्या घराबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आज विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर काही विदर्भवादी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
दरम्यान फडणवीस यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विदर्भावादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं येथे पाहायला मिळत आहे. विदर्भवादी आंदोलकांना वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरात अडवण्यात आलं आहे. संविधान चौकापासून आंदोलकांचा लाँग मार्च सुरु झाला.  सुरुवातीला मोर्चा शांततेनं निघाला होता, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यावर आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
 
आंदोलक पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स ओलांडून फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, पोलिसांना काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
 
‘या’ आहेत प्रमुख मागण्या:
 
वेगळं विदर्भ राज्य ही विदर्भवादी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच विज दरवाढीसाह इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. विदर्भामध्ये काही जुने औष्णिक वीज प्रकल्प आहेत, त्यासोबतच नव्यानेही प्लांट उभारले जात आहेत. मात्र, विदर्भातील जनतेला त्याचा कोणताही फायदा होत नाही. विदर्भातील जनतेला वीज दरात सूट देण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. उलट औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भवाद्यांचा विरोध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 26 वी अटक, शूटर्सना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणाऱ्याला अकोल्यातून अटक

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, दहावीचा पेपर 21 फेब्रुवारीपासून तर बारावीचा पेपर 11 फेब्रुवारीपासून होणार

भाजप जिंकल्यास फडणवीस मुख्यमंत्री होणार ! या बैठकीनंतर गोंधळ वाढला

'महाराष्ट्रात एमव्हीए बहुमताने जिंकेल', निवडणूक निकालापूर्वी रमेश चेन्निथला यांचा दावा, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हे बोलले

पुढील लेख
Show comments