Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक भाजपविरोधी आघाडीसाठी नाही- यशवंत सिन्हा

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (22:44 IST)
राष्ट्र मंचची बैठक भाजपविरोधात शरद पवार यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी बोलवली ही चुकीची माहिती आहे.ही राष्ट्र मंचची बैठक होती,असं माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केलं.
 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रमंचची बैठक आज (22 जून) आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
 

या बैठकीनंतर यशवंत सिन्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 

विरोधी पक्ष एकत्र येत तिसरी आघाडी उघडणार का? हा प्रश्न या बैठकीच्या आधी उपस्थित केला जात होता. मात्र, यशवंत सिन्हा आणि माजिद मेमन यांनी ही शक्यता फेटाळली.
 

या बैठकीला काँग्रेसकडून कोणी उपस्थित नसल्यानं काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचा पर्याय अवलंबला जात आहे का, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, काँग्रेसला निमंत्रण दिलं होतं. त्यांच्यावर बहिष्कार नव्हता असंही बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं.
 
 

बैठकीत कोण-कोण उपस्थित?

भाजपतून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले यशवंत सिन्हा,सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम, काँग्रेसमधून निलंबन झालेले संजय झा, अरुण कुमार, घनश्याम तिवारी, माजिद मेमन, वंदना चव्हाण, माजी आयएएस अधिकारी, नितिश कुमार यांचे माजी सल्लागार आणि राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे छत्तीसगडमधून राज्यसभेचे खासदार के.टी.एस तुलसी, आपचे खासदार सुशील गुप्ता उपस्थित होते.
 

बैठकीला केवळ राजकीय नेत्यांचीच उपस्थिती नाहीये. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, इराणमध्ये भारताचे निवृत्त राजदूत के.सी.सिंह, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि मानवी हक्क लॉ नेटवर्क संस्थेचे संस्थाचालक कॉलिन गोन्साल्विस, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी, कवी, चित्रकार, पत्रकार आणि 1998 शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेले प्रितिश नंदी, रविंदर मनचंदा, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, सीपीएमचे माजी खासदार निलोलपल बासू, निवृत्त न्यायमूर्ती एपी शहा उपस्थित होते.
 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याही बैठकीमध्ये होत्या.
 

राष्ट्र मंच काय आहे?

यशवंत सिन्हा यांनी ट्वीट करून मंगळवारी (22 जून) शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंचची बैठक होणार असल्याचं म्हटलं आहे.
 
 
सिन्हा यांनी तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये 'राष्ट्र मंच'चे समन्वयक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी मंगळवारी (22 जून) जी बैठक होणार आहे, ती 'राष्ट्र मंच'च्या बॅनरखाली होणार आहे, असं यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केलंय.
 

ट्विटरवर या मीटिंगबद्दल माहिती देणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, याआधी राष्ट्रमंचची बैठक व्हायची तेव्हा कोणाच्या लक्षातही यायचं नाही.
 
 

प्रशांत किशोर यांची भूमिका काय?

सोमवारी (21 जून) शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली. त्यानंतर आजच्या राष्ट्र मंचच्या बैठकीचा आणि प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेण्याबाबत खलबतं सुरू झाली.
 

या दोन्ही बैठकींचा परस्परांशी संबंध नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बीबीसी मराठीला दिली. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेलांनी ही माहिती दिली.
 
 

"प्रशांत किशोर-शरद पवार यांच्यामध्ये झालेली बैठक आणि आज होणारी राष्ट्र मंचाची बैठक या दोन्ही राजकीय घडामोडींमध्ये काही संबंध नाही. शरद पवार यांच्याकडून कुठलाही आमंत्रण गेलेले नाही राष्ट्र मंचाच्या लोकांनी आमंत्रण देऊन लोकांना बोलावलं आहे," असं पटेल यांनी स्पष्ट केलं.
 

लोकसभेच्या आगामी अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होईल, शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाईल, असं म्हटलं जात आहे.
 

या बैठकीपूर्वी त्यांनी आज (21 जून) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. गेल्या दहा दिवसांत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दोन वेळा चर्चा झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

11 जून रोजी प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती.
 

प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू निवडणुकांमध्येही सहकार्य केले होते. त्यामुळे आगामी 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार तिसरी आघाडी उघडणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता यांना गुरुग्राममधून अटक

गाझामधील निर्वासित शिबिरावर इस्रायलचा हल्ला, 22 जण ठार

नितेश राणे, पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार

वीर सावरकर, UBT, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना गप्प का, श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला सवाल

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात या नव्या चेहऱ्यांना मिळणार स्थान!

पुढील लेख
Show comments