Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओबीसी आरक्षण सुनावणी आता 28 फेब्रुवारीला होणार

Webdunia
शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (08:15 IST)
ओबीसी आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजे उद्या कोर्टात यावर सुनावणी पार पडणार होती, मात्र कोर्टाने सुनावणी आता सोमवारी 28 फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर केले आहे. कार्यालयीन कारणामुळे ही सुनावणी पुढे गेली आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अंतरिम रिपोर्टनुसार निवडणुकांना परवानगी द्यावी असा अर्ज राज्य सरकारकडून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आता या सुनावणीवर अवलंबून असणार आहे.
 
सर्वोच्च न्यायलयाने 17 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नसल्याचा आदेश जाहीर केला होता, त्यामुळे महाराष्ट्रातील 105 नगर पंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये घेण्याची वेळ आली होती. परंतु आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसींसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातील असल्याचे गृहीत धरण्यात यावे असा आदेश कोर्टाने जाहीर केला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

LIVE: गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धनंजय मुंडेंनी दिलं मोठं वक्तव्य- मी राजीनामा देईन, पण

Prayagraj Mahakumbh Stampede :महाकुंभ चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू ,प्रशासनाने जाहीर केली आकडेवारी

परीक्षा केंद्रांवर बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी मंत्री नितीश राणे यांनी केली

पुढील लेख
Show comments