Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई विद्यापीठाचे चार परीक्षाचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाचे चार परीक्षाचे निकाल जाहीर
, बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (10:45 IST)
मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर / डिसेंबर, २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र व ह्युमन सायन्स सत्र ५ हे विज्ञान शाखेचे दोन व बीई संगणक अभियांत्रिकी व बीई स्थापत्य अभियांत्रिकी सत्र ७ या अभियांत्रिकीचे शाखेचे दोन असे एकूण चार परीक्षांचे निकाल जाहीर केले. या चार परीक्षांत मिळून १० हजार ००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 
 
चारही परीक्षेत मिळून १२ हजार १६८ विद्यार्थी बसले होते. यातील तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र सत्र ५च्या परीक्षेत ३,३८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ३,३७८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, यातील २,३५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ७१.९६ % एवढी आहे. बीई संगणक अभियांत्रिकी सत्र ७च्या परीक्षेत ५,५७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५,५१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील ५,१२३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ९३.४२ % एवढी आहे. बीई स्थापत्य अभियांत्रिकी सत्र ७च्या परीक्षेत ३,३१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ३,२५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, यातील २,५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ७८.१२ % एवढी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपसोबतच्या युतीचं समर्थन