suvichar

'त्या' सात जणांची शोध मोहीम सुरु

Webdunia
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (17:11 IST)
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं भारतासह अनेक देशांची झोप उडवली आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रातही दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रातही भीतीचं सावट आहे. 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान जवळपास 7 जण साऊथ आफ्रिकेतून ठाण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे पालिका आयुक शर्मा यांनी ही माहिती दिली. या 7 जणांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली आहे. 
 
या 7 जणांना कोणती लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहे. डोंबिवलीची घटना ताजी असतानाच ठाण्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या आणि कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या जिनोम सिक्वेंसींग तपासणीचा अहवाल 7 दिवसांत येणार आहे. त्याच्या कुटुंबातील 6 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

NEET UG 2026 परीक्षा रद्द, २२ लाख विद्यार्थ्यांना मोठा धक्का

महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हवाई प्रवासाला स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या परवानगीशिवाय एकही विमान उडणार नाही

LIVE: शरद पवार यांनी एका निवेदनातून पंतप्रधान मोदींकडे एक मोठी मागणी केली

पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, पंतप्रधानांकडे ही महत्त्वाची मागणी

हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

पुढील लेख
Show comments