Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

राज्य सरकारचे डोक फिरलं आहे ,म्हणत फडणवीसांकडून सरकारवर टीका

The state government is dizzy
, गुरूवार, 27 जानेवारी 2022 (08:39 IST)
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमुळे किरीट सोमय्या अडचणीत आले आहेत. सोमय्यांना राज्य सरकारकडून नोटीस बजावली आहे. व्हायरल फोटोमध्ये सोमय्या मंत्रालयात नगरविकास खात्यातील अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसलेले आहेत. त्यांनी खुर्चीत बसून फाईल्स तपासल्याचे असल्याचे सांगितले जात आहे.व्हायरल फोटोची राज्य सरकारने दखल घेतली आहे. 
 
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारचे डोक फिरलं आहे. अण्णा हजारे यांनी केलेल्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार मिळाला आहे. या अधिकारानुसार कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा अधिकार सामान्य माणसाला आहे. त्याच अधिकाराचा वापर सोमय्यांनी बजावला, कागदपत्रे तपासताना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे. कोणाच्या मालकिचं ऑफिस नाही. मी जाणीवपूर्वक कोणाच्या मालकिचं ऑफिस नाही या शब्दाचा वापरत करत आहे. ही खासगी मालमत्ता आहे अशा शब्दात फडणीसांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे.
 
अधिकाऱ्यांना आणि सोमय्यांना नोटीस बजावण्यात येत आहेत. त्यामुळे कडक शब्द वापरत नाही. किरीट सोमय्यांना नोटीस बजावण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कोणत्या अधिकारात नोटीस देता. फोटो प्रसिद्ध झाला तो कोणी काढला हे तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तेच तक्रारदार आहेत. त्यामुळे ही मिलीभगत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. एकीकडे चोरी करायची आणि ती उघड करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला बदनाम करायचे हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ३५ हजार ७५६ नवीन करोना रुग्ण